देणगी विभाग


प्रिय मित्र

सप्रेम नमस्कार, स्वागत आणि विशेष आभार

ई साहित्यच्या वेबवरील या देणगी पेजला सहसा कोणी भॆट देत नाही. म्हणून तुमचं खास स्वागत. सध्या सर्वत्र लुबाडण्याची आणि ओरबाडण्याची स्पर्धा चालू असता आपण स्वतःहून देणगी देण्याची ईच्छा मनात आणलीत हेच खूप मोठे. आपले मनापासून आभार मानतो.

ई साहित्य प्रतिष्ठानचे कार्यकर्ते स्वतःचा खर्च आणि ई पुस्तकांच्या चळवळीचा खर्च स्वतःच स्वतःच्या खिशातून भागवतात. आणि शक्यतोवर तसेच चालू राहील.

ई साहित्य प्रतिष्ठान ही बिगरसरकारी स्वतंत्र संस्था आहे. कोणत्याही उद्योगसमूहाशी निगडित नसलेली. कोणत्याही पक्ष वा संघटनेशी न बांधलेली. कोणत्याही विशिष्ट विचारसरणीशी न बांधलेली. ई साहित्य प्रतिष्ठानची बांधिलकी फ़क्त मराठी भाषा व मराठी वाचक यांच्याशी आहे. आजवर शेकडो पुस्तकं तयार करून लाखो वाचकांपर्यंत ई मेल द्वारे विनामूल्य पोचवण्यात आलेला खर्च या संस्थेच्या सभासदांनी स्वतःच उचलला.

मात्र हे सर्व काम चालतं त्याचा मुख्य कणा आहे ई साहित्यचे लेखक. आपले साहित्य विनामूल्य प्रकाशनासाठी देणार्‍या लेखक कवींमुळेच हे कार्य आम्ही चालवू शकतो. अनेकदा ज्या पुस्तकातून हजारो लाखो रुपयांचं मानधन मिळू शकेल अशी पुस्तकं आमचे लेखक, एकाही पैशाची अपेक्षा न ठेवता मराठी वाचकांसाठी उपलब्ध करून देतात. त्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत.

लेखक कवींच्या प्रतिभेचे मोल पैशांत करणे शक्य नसले तरी त्यांना मानधन मिळाले पाहिजे असे आम्ही मानतो. इतकेच नव्हे तर साहित्याला वाहून घेतलेल्या लेखकाला त्याचे आयुष्य चांगल्या प्रकारे मानाने व्यतीत करता यावे इतके मानधन लाभायलाच हवे. आज ना उद्या ई साहित्य प्रतिष्ठान सारख्या साहित्य प्रेमींची चळवळ त्या दिशेने जाईल आणि त्या उंचीवर पोहोचेल अशी आम्हाला खात्री आहे. आणि ही खात्री वाटण्याचं कारण म्हणजे तुम्ही. तुमच्यासारखे स्वतःहून देणगी देणारे वाचक आहेत.

आपण रुपये शंभर ते रुपये दहा हजारपर्यंत कितीही देणगी देऊ शकता. एक हजारहून अधिक देणगी देणार्‍यांना ई साहित्यच्या १००० पुस्तकांची पेनड्राईव्ह भेट मिळेल. त्यासाठी आपला पत्ता, पिन कोड, फ़ोन नंबर व देणगी दिल्याचे प्रुफ़ ई साहित्यला मेल करा. ठरवा आपल्या देणगीचा आकडा आणि लिहा esahity@gmail.com ला.

A/C Name : E Sahity Pratishthan
A/C No. 32631252535
State Bank of India
​IFSC : SBIN0005354